नागपूर :
शंकरनगर नागरिक सांस्कृतिक मंडळातर्फे १० नोव्हेंबर रोजी आयोजित ‘दीप संध्या – संधिकाळी या अशा’ हा सुरेल संगीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विविध गायक कलाकारांच्या सुमधुर गीतांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन . सृष्टी शिरपुरकर यांनी केले, तर उत्कृष्ट निवेदन मंजुषा आठल्ये यांनी केले.
या कार्यक्रमात मनीषा अंधुळकर, डॉ. रजत शिरपुरकर, विशाखा मंगदे, .अनुपमा घाटे, स्वाती पटवर्धन, वंदना काशिकर आणि . कावेरी काशिकर यांनी आपल्या सुरेल गायनाने संध्याकाळ रंगतदार केली.कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळण्यासोबतच नागरिकांमधील स्नेह व सामाजिक एकोपा वाढतो. कार्यक्रमाचे प्रायोजक राऊत नर्सिंग होम व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे आयोजकांनी आभार मानले.



