अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त सेठ केसरिमल पोरवाल महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालय परिसरात ३ ऑक्टोबर रोजी ‘ग्रंथदिंडी’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश मराठी भाषेची समृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक परंपरा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, वाचनाची आवड निर्माण करणे आणि मराठी भाषेविषयी अभिमान जागविणे हा होता.
उपक्रमाची रूपरेषा
प्रा. आशिष क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाला मराठी विभागप्रमुख डॉ. नीता वानखेडे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. स्वप्निल दहाट, उपप्राचार्य प्रा. डॉ. इप्तिकार हुसेन, प्रा. विश्वनाथ वंजारी, पर्यवेक्षक प्रा. नरेंद्र मेंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विशेष तयारी
ग्रंथदिंडीच्या आयोजनासाठी प्रा. ज्ञानेश्वर रेवतकर व प्रा. मासुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. “मराठी भाषा हीच आपली अभिजात ओळख” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



