नागपूर:
राजाबाक्षा येथील नवयुग प्राथमिक शाळेत १० सप्टेंबर रोजी पोळा सणानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना पोळा आणि तान्हा पोळ्याचे महत्त्व समजावणे आणि आपल्या कृषिप्रधान संस्कृतीची ओळख करणे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक अजय काळे यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या व ओघवत्या भाषेत पोळा आणि तान्हा पोळ्याची माहिती दिली. त्यांनी पोळा सणाच्या पावन पर्वाचे महत्त्व अधोरेखित करणारे सुंदर गीतही सादर केले.
कार्यक्रमात श्री. राकेश कडू यांनी पोळा सणाचे महत्त्व विशद केले, तर खनगन यांनी मारबत परंपरेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी काही विद्यार्थी शेतकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते, ज्यामुळे कार्यक्रमाला पारंपरिक आणि उत्सवी रंगत आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे यांनी केले, तर सीर्तावार यांनी आभार मानले. शेवटी, ध्यानसाधनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



