कनका सूर मंदिरमध्ये दिवाळी सोहळा उत्साहात
नागपूर:
कनका सूर मंदिर क्लासमध्ये ३० सख्यांच्या उपस्थितीत दिवाळी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गाण्यांच्या भेंड्यांचे चार मनोरंजक राउंड आयोजित करण्यात आले. नट-नटींवरील गाणी, वाद्यांच्या आधारे गाणी ओळखणे आणि विरुद्धार्थी शब्दांवर आधारित गाणी म्हणणे अशा खेळांनी कार्यक्रमात रंगत आणली.
सर्व सख्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कनका मॅडम यांनी केलेली आकर्षक दिवाळी सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. प्रत्येक सखीला भेट म्हणून पणती देण्यात आली. दिवाळीचा फराळ, गाणी आणि हास्यविनोदामुळे वातावरण आनंदमय झाले.



