नागपूर: 

जुना सुभेदार लेआउट येथील ताल साधना संगीत विद्यालयातर्फे ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी पहाट संगीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. अल्पावधीत सराव करूनही कलाकारांनी सुरेल गायन सादर करून रसिकांची मने जिंकली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून परशु ठाकूर व नगरसेविका  रुपाली ठाकूर उपस्थित होते. श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात मेधा भांडारकर यांनी प्रभावी निवेदन केले. विविध कलाकारांनी सुमधुर गीते सादर केली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चंद्रशेखर इंगळे, अनिल येवले, प्रशांत देशपांडे, आनंद जोग, दामले, मानसी राऊत व पूनम कावळे यांनी विशेष सहकार्य केले. विद्यालयाचे आयोजक हेमंत उपगडे यांनी सर्व कलाकार, पाहुणे, श्रोते व सहकाऱ्यांचे आभार मानले.संगीत आणि सांघिक भावनेचा सुंदर संगम ठरलेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.