नागपूर -
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये मराठी विभागातर्फे अभिजात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मराठी भाषेची समृद्ध परंपरा जपणे आणि तिचा अधिकाधिक वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विभागप्रमुख प्रा. दीपक ठाकरे यांनी मराठी भाषेचा इतिहास, प्राचीन साहित्य व संत साहित्याचे महत्त्व विशद केले. त्यांच्या भाषणात मराठी भाषेच्या विकासाबाबत विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अश्विनी नंदेश्वर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. सुषमा वडस्कर यांनी केले. आभार प्रा. मोहिनी सोनवणे यांनी मानले. या कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे मराठी भाषेच्या संस्कृतीला एक नवा उत्साह मिळाला.



