नागपूर:
डॉ. प्रज्ञा पुसदकर यांनी संपादित केलेल्या आणि समर्थ रामदास स्वामींचे प्रशिष्य माधव स्वामी लिखित ‘रामायणातील युद्धकांड’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवार, २५ ऑक्टोबर रोजी आमदार निवासातील व्ही.आय.पी. हॉलमध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात आसावरी पुसदकर हिच्या भजनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आशा पांडे होत्या. धुळे येथील सत्कार्योत्तेजक सभेचे अध्यक्ष प्रा. विश्वास नकाणेकर प्रमुख पाहुणे होते, तर सज्जनगडचे अजेय बुवा रामदासी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
रामायणाचे महत्त्व
यावेळी वक्त्यांनी रामायणाचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी मराठीतील मौल्यवान साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. डॉ. प्रज्ञा पुसदकर यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.



