नागपूर:
महिला कला निकेतन, गोरेपेठ येथे तीन दिवसीय शारदा उत्सव विविध सांस्कृतिक व कलात्मक उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. या उत्सवात मॉंटेसरी व क्राफ्ट शिक्षक प्रशिक्षणार्थींनी ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांविषयी जनजागृती करणारा देखावा सादर केला.
उत्सवादरम्यान श्रीसूक्त पठण, रांगोळी स्पर्धा, भुलाबाईची पारंपरिक गाणी आणि खिरापत ओळखण्याचा खेळ आयोजित करण्यात आला. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण नेत्रा लाखे आणि पायल जोशी यांनी केले. प्रसिद्ध चित्रकार नेहा मुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉफी पेंटिंग कार्यशाळाही घेण्यात आली.परंपरा, पर्यावरण जागरूकता आणि कलात्मकतेचा सुंदर संगम साधणाऱ्या या उत्सवात प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संस्थेचे पदाधिकारीही सर्व कार्यक्रमांना उपस्थित होते.



