नागपूर, 

 स्वर्गीय अशोकजी सिंघल जन्मशताब्दी समारोह समितीतर्फे पूज्य दीदी माँ साध्वी ऋतंभरा देवी यांच्या श्रीराम कथेचे आयोजन गणेश मैदान, भेंडे लेआउट, दीनदयाळ नगर येथे करण्यात आले आहे.

श्रीराम कथेत कलाश्री फाउंडेशनची गायन सेवा

कथेच्या दुसऱ्या दिवशी कलाश्री फाउंडेशनतर्फे कथा प्रारंभापूर्वी गायन सेवा अर्पण करण्यात आली. या अद्वितीय कार्यक्रमात फाउंडेशनचे संस्थापक वत्सल कपाळे यांनी गायन केले. त्यांना विश्वेश देशपांडे, वेदांत बक्षी, तृप्ती काशीकर आणि आर्या खानापूरकर यांनी साथ दिली. वाद्यवृंदावर अथर्व टेकाडे, हर्षद पायघन, अभय गोसावी, नचिकेत देव आणि प्रत्युष कुलकर्णी यांनी साथसंगत केली.या कार्यक्रमात कलाश्री फाउंडेशनचे अन्य सदस्यही उपस्थित होते, ज्यामुळे या सांस्कृतिक कार्यकमाला एक विशेष रंगत प्राप्त झाली. गायन सेवा भक्तिरसात बहरलेली होती, ज्यामुळे उपस्थित भक्तांनी आनंद घेतला.