नागपूर : 

पार्वती कॉम्प्लेक्स, डॉक्टर पडोळे चौक येथील युवा अभियंता कैवल्य केजकर याने शास्त्रीय संगीतावर आधारित विठ्ठल-रखुमाई भक्तिगायनाने साई सभागृहातील रसिकांना मंत्रमुग्ध केले. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित 'का रुसली रखुमाई' या विनामूल्य संगीतमय नाटकात त्याने २० हून अधिक नाट्यपदे सादर केली.

सुमारे ४५० रसिकांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कैवल्यच्या गायनाला उभे राहून दाद देण्यात आली. सुप्रसिद्ध साहित्यिक रवींद्र शोभणे यांनी त्याच्या गायनाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन शेखर बेंद्रे यांनी केले. कैवल्य केजकर याने नाट्यसंगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.