नागपूर,
भारतीय चित्रपटसृष्टीतील सदाबहार गीतांची सुरेल सफर घडविणारी ‘बॉलीवूड हिट्स’ ही सांगीतिक मैफल स्वरमेघ आर्ट फाउंडेशन आणि स्वप्नगंध यांच्या वतीने दि. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या मैफलीत बॉलीवूडच्या सुवर्णकाळापासून आजवर गाजलेली लोकप्रिय गीते सादर केली जाणार आहेत. या कार्यक्रमात स्मिता टोणगावकर, निकेता जोशी, माया सायखेडकर, प्रीती कुलकर्णी, प्रकाश देशपांडे, अजय देशपांडे व समीर उपाध्ये हे कलाकार आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.संगीत संयोजन परिमल जोशी यांचे आहे, जे या मैफलीच्या सुरेल वातावरणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्वरमेघ आर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष मनीष उपाध्ये यांनी केले आहे.



