नागपूर. शहराची ओळख केवळ उंच इमारती आणि रुंद रस्त्यांमुळे होत नाही, तर त्याच्या जलस्रोतांमुळे, हरित क्षेत्रांमुळे आणि पर्यावरणीय वारशामुळेही होते. पश्चिम नागपुरातील ऐतिहासिक पांढराबोडी तलाव आज आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. एकेकाळी सुमारे २७ एकर परिसरात पसरलेला हा तलाव आता अवघ्या ६ एकरांवर येऊन ठेपला आहे. अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे, अतिक्रमणामुळे, कचऱ्यामुळे आणि अपूर्ण विकासकामांमुळे या ऐतिहासिक वारशास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर नागपूर प्लॉगर्स यांनी "मिशन सेव पांढराबोडी लेक" या जनआंदोलनाची रविवारी 5 जुलाई 2026 ला तलाव वाचवन्यासाठी सुरुवात केली. हा केवळ स्वच्छता अभियान नसून, भावी पिढ्यांसाठी जलसंवर्धनाचा सामूहिक संकल्प आहे.
या अभियानात आमच्यासोबत रेड स्वास्तिक सोसायटी, एग्रोवेट संस्था, इको फ्रेंडली संस्था, एनाकॉन लॅबोरेटरीज, ईशा फाउंडेशन, बाजीप्रभू नगर रहिवासी, संजय नगर रहिवासी, विजयीनी सखी मंच तसेच टेनिस अकादमी असोसिएशन (बाजीप्रभू नगर) यांच्यासह अनेक सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी सक्रिय सहभाग नोंदविला.
तलावाच्या अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या मुख्य कारणांची माहिती
शहरात आल्यामुळे याला वाचवणे गजेचे आहे. या मुळे भूमीतील जल स्तर वाढवण्यात मदत होईल. पांढराबोडी तलावाची सध्याची स्थिती आणि त्याचा आकार जवळपास 6 एकर आहे. तलावात पाणी थांबत नाही, Outlet मोकळे आहे, आणि तलावात येणाऱ्या पाण्याचा मार्ग भिंतनुभि करून बंद करण्यात आला आहे. तलावात कमळाचे फूल लागली आहेत. जवळच एक विहिरी आहे, त्याला ही जिवंत करण्याची गरज आहे.
विशेष क्रियाकलापांची योजना
माहिती प्रमाणे NMC नी 2022 मध्ये याला ठीक करण्यासाठी जवळपास 3 कोटी रुपये खर्च केला. पण तलावाची स्थित जशीच्या तशीच आहे. ही जागा शहराच्या मधोमध असल्यामुळे इथे सुंदर पर्यटन स्थळ निर्माण होऊ शकते.
तलावाच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना
या अभियानानंतर तलावाचे खोलीकरण, पाणी येण्याचा मार्ग उघडणे, पाणी बाहेर जाण्याचा मार्ग बंद करणे, तलावात पाणी साचल्यावर त्यात कमळाचे विविध प्रजाती लावणे, आणि हिरवळ तयार करणे यासारख्या ठोस उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.



