मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलला प्रतिष्ठेचा पर्यावरण पुरस्कार

नागपूर,
ब्लाइंड रिलीफ असोसिएशन, नागपूरद्वारे संचालित मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलला पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘IEI पर्यावरण साथी पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), नागपूर लोकल सेंटरतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. खासगी विनाअनुदानित शाळा – शहरी विभाग या श्रेणीत शाळेने हा सन्मान मिळविला.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करणे, शाश्वत जीवनशैली आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणे या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या सन्मानामुळे शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शाळेच्या या कार्यामुळे परिसरातील इतर शाळा आणि संस्थांना देखील प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.