बुटीबोरी -
कर्मण्येय स्कूल ऑफ एक्सीलेंसच्या संचालिका प्रीती एस. कानेटकर आणि प्राचार्या डॉ. उन्नती दातार यांना ग्लोबल सस्टेनेबिलिटी अवॉर्ड्स २०२६ अंतर्गत ‘स्कूल लीडर’ आणि ‘एसडीजी व्हिजनरी’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हा समारंभ १० ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील मिरांडा हाऊस येथे पार पडला.
पर्यावरणसंवर्धनासाठी उपक्रम
कर्मण्येय स्कूल ऑफ एक्सीलेंसमध्ये पर्यावरणसंवर्धन आणि शाश्वत विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये बियाणे संकलन, सीड-बॉल निर्मिती व वितरण, इको-ब्रिक्स, कंपोस्ट पिट व्यवस्थापन आणि माइंडफुलनेस उपक्रमांचा समावेश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजविण्याचा प्रयत्न केला जातो.
अभिनंदन आणि कौतुक
या यशाबद्दल एसएसकेईएसच्या अध्यक्षा प्रतिभा घाटे यांनी सन्मानित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. शाश्वत विकास आणि पर्यावरणसंवर्धनासाठी विद्यालय करीत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली आहे, जे समाजासाठी एक महत्त्वपूर्ण योगदान आहे.



