प्लास्टिक कचरा संकलन मोहीम
मारबत उत्सव 2026 निमित्त, मनपा नागपूरच्या सर्व शाळांमध्ये प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत, ऊंटखाना मराठी प्राथमिक शाळा येथे दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी एकत्र येऊन प्रदूषणाबाबत जनजागृती केली.
या मोहिमेत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 15 विद्यार्थ्यांनी आणि 2 शिक्षकांनी सहभाग घेतला. या मोहिमेत 2 बोरे (5 किलो) प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला.
वृक्ष रोपांचे संवर्धन
प्लास्टिक कचरा संकलनाच्या मोहिमेसोबतच, वृक्ष रोपांचे संवर्धन करण्यात आले. यामध्ये वड, केळी, सीताफळ व काही फुलझाडांचा समावेश होता. वृक्ष रोपांच्या सभोवतालच्या जागेची स्वच्छता व जल सिंचन केले गेले.
शाळा परिसराची स्वच्छता
शाळा परिसराची स्वच्छता मोहिम देखील राबविण्यात आली. यामध्ये प्लास्टिक व झाडांचा पालापाचोळा संकलीत करून परिसर स्वच्छ करण्यात आला.



