मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
नागपूर :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त पश्चिम नागपूरातील फ्रेंड्स कॉलनी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
या उपक्रमात फ्रेंड्स कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक, विविध समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक सहभागी होणार आहेत. अनुलोम संस्थेच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात लावण्यात येणाऱ्या वृक्षांचे संवर्धन व देखभाल अनुलोम मित्र परिवाराकडून करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.



