ग्रंथालय भारती तर्फे प्रकाशित यंदाच्या दिवाळी अंक 2025 चे प्रकाशन 18 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी पाच वाजता मधुकर भवन, डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर, रेशीम बाग येथे होणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक श्री अतुल मोघे यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात येईल.

याप्रसंगी संस्कार भारतीचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख श्री आशुतोष अडोनी यांचे वाचन संस्कृतीवर व्याख्यान ठेवण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमाला जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथालय भारती नागपूर महानगराचे अध्यक्ष श्री प्रशांत तुंगार यांनी केले आहे.