सुरमयी यादों की शाम
'सेव्हन नोट्स' आयोजित 'सुरमयी यादों की शाम' या कार्यक्रमात गायक कलाकारांच्या बहारदार प्रस्तुतीने रसिकांच्या हृदयाच्या तारा छेडल्या. हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक ३१.१०.२०२५ ला सायंकाळी ६ वाजता सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे संपन्न झाला.
संगीताची जादू
कार्यक्रमाच्या नावाला सार्थ करत सुरमयी सांज यादगार ठरली. 'झुकी झुकी सी नजर', 'होठों से छु लो तुम', 'वादा तेरा वादा', 'रोज रोज आँखो तले', 'दिल चीज है क्या', 'अखिंयोंके झरोकोंसे', 'मैं चली मैं चली' यांसारख्या तब्बल २७ सुमधुर गीतांनी रसिकांच्या स्मृतींना उजाळा मिळाला.
कलाकारांची यादी
या कार्यक्रमाची संकल्पना मुकुल पांडे व प्रा पद्मजा सिन्हा यांची असून निवेदन वैभव पारसकर करणार आहेत. गायक कलाकारांमध्ये मुकुल पांडे, पद्मजा सिन्हा, डॉ. सुधीर कुन्नावार, सुचिता पद्मावार, अमित पेढेकर, अर्चना उचके, आरती भालेराव, जयवंत इंगळे, शशिकांत वाघमारे, लता व दीपक राईरकर, स्वप्निल नांदे, प्रकाश कुलकर्णी, रजनी ठाकरे, सुषमा खांडेकर, संगीता भगत यांचा समावेश आहे.
संगीत संयोजन
गायकांना आर्य पुराणकर व सचिन ढोमणे यांच्या संगीत संयोजनाची समर्पक साथ मिळाली. या कार्यक्रमाने रसिकांना संगीताच्या सुरमयी जगात नेले आणि गतस्मृतींच्या हिंदोळ्यावर झुलवले.



