बालजगत मधे बाल गुरुकुलचा प्रारंभ
नागपूर,
१ ४ नोव्हेंबर, भारताचे पहिले पंतप्रधान हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस .बालकदिन म्हणून साजरा केला जातो ,याच दिवसाचे औचित्य साधून
बालजगत मध्ये बाल गुरुकुलचा प्रारंभ झाला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश, मुलांना चांगले संस्कार देणे आणि त्यांना कला, संस्कृती आणि उत्सव यांचे महत्त्व शिकवणे आहे.
या कार्यक्रमात बालजगतचे अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे, बालजगतच्या प्रकल्प प्रमुख अनुजा परचुरे, तसेच निता केकरे ,गौरी सरनाईक,माधवी जोशीराव आणि उत्तरा नवरे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांनी मुलांना चांगले संस्कार देण्यावर जोर दिला.
या विशेष कार्यक्रमात अॅक्टिविटी कला उत्सव आणि विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे मुलांना आनंद मिळाला.
या उपक्रमामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे आयोजकांचे मत आहे.



