चिमुकल्यांचा किल्ला महोत्सव: एक प्रेरणादायी उपक्रम

नागपूर,

दिवाळीच्या सुट्यांत त्रिमुती नगर येथील MIG 24 या इमारतीच्या परिसरात व्यवसायाने शिक्षक असलेल्या  दिपा काकडे गायकवाड यांनी एक अनोखा उपक्रम राबवला. 'किल्ला तयार करणे' या पारंपरिक उपक्रमात लहान मंडळींनी इतिहासाचा मागोवा घेण्याचा एक अनोखा अनुभव घेतला.

मागील वर्षी शिवनेरी किल्ला तयार केल्यानंतर, या वर्षी त्यांनी रायगड किल्ला साकारला. या उपक्रमात मुलांनी स्वतः माती, दगड, विटा व इतर साहित्य जमवून एक किल्ला तयार केला. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या कल्पनेने आमंत्रण पत्र तयार करून मोठ्या मंडळींना आदरपूर्वक आमंत्रित केले.

या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांनी छत्रपती शिवरायांची व गडकिल्यांची माहिती दिली आणि अभिप्राय घेतला. आराध्या खर्चे, अद्रुविक डेहनकर, अन्वी वघळे, पुण्य चांदेकर, प्रिशा चांदेकर यांसारख्या मुलांनी या उपक्रमात अत्यंत परिश्रम घेतले. विशेषतः देवर्ष डेहनकर, जो अवघ्या दिड वर्षांचा आहे, त्याने शिवरायांच्या ललकारीला उत्तम प्रतिसाद दिला.

 हा किल्ला महोत्सव एक प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे, ज्यामुळे लहान मुलांना त्यांच्या दैदिप्यमान इतिहासाची जाणीव झाली.