'क्लाऊड नाइन' ही संस्था रसिकांसाठी *सुरमयी शाम* हा हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा घेऊन आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी नगरातील आठ रस्ता चौकातील सायंटिफिक सभागृहात करण्यात आलेले होते.या कार्यक्रमाची संकल्पना मेधा हरिदास, दीपाली पनके, मृदुल पुरोहित आणि शशिकांत वाघमारे यांची होती. श्याम बापटे हे सहसंयोजक होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्रा. पद्मजा सिन्हा व मुकुल पांडे यांनी केले. प्रा. उज्ज्वला अंधारे यांनी नेटके निवेदन केले.
कार्यक्रमाची सुरुवात 'दिसते मजला सुखचित्र नवे' या मराठी गीताने झाली. त्यानंतर 'तेरे नाम...', 'कोरा कागज था', 'वो जब याद आये', 'मुझे कितना प्यार है तुमसे', 'वो सनम तेरे हो गये हम', 'पत्ता पत्ता बुटा बुटा' अशी एकाहून एक सरस तब्बल ३२ गाणी सादर करण्यात आली.
या कार्यक्रमात गाणारे कलाकार प्रा. पद्मजा सिन्हा, मुकुल पांडे, रजनी ठाकरे, वैभव पुसदकर, संजय बोरकर, प्रसाद देशपांडे, गौरी बावडेकर, दीपक दुधमोगरे, हेमंत राऊत, प्रीती कुळकर्णी, अस्मिता शिवलकर, मुकुल नांदे, संजय वाघमारे, प्राजक्ता केळकर, सुनील दहिकर, रेखा पाटील, समृद्धी ठाकरे, बाबासाहेब ठाकरे यांचा समावेश होता.



