पिंपळकुटा, धामणगाव येथे दिनांक ३०.१०.२५ रोजी बेटीया शक्ती फाउंडेशन तर्फे गरीब मुलींना शालेय शिक्षण साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात २१९ विद्यार्थ्यांना बॅग, नोट बुक, पेन यासारखी शालेय साहित्य वितरित करण्यात आले.

फाउंडेशनचा उद्देश गरीब मुलींना शिक्षणाच्या क्षेत्रात मदत करणे आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात एक सकारात्मक बदल घडवण्यास मदत होईल, असे आयोजकांनी सांगितले.