अर्थशास्त्र विभागाची कृषी विज्ञान केंद्रात शैक्षणिक सहल

नागपूर : 

अर्थशास्त्र विभागातर्फे सेलुसर येथील कृषी विज्ञान केंद्र येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत कृषी उत्पादनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती आत्मसात केली.

सहलीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी ‘ऑर्गेनिक फार्मिंग’ या विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये सेंद्रिय शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेतीतील नव्या पद्धतींचे ज्ञान मिळाले.या सहलीचा मुख्य उद्देश उत्पादन व उत्पादकता वाढविण्यावर केंद्रित होता. विद्यार्थ्यांना स्ट्रॉबेरी शेती, कापूस उत्पादन तसेच कृषी क्षेत्रातील बदलांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे त्यांची कृषी विषयक समज अधिक दृढ झाली.

सहलीदरम्यान प्रा. अर्चना कावळे, सहायक प्राध्यापक कमलेश सर तसेच इतिहास विभागाच्या प्रमुख कविता मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कृषी उत्पादनाचे विविध पैलू आणि उत्पादन वाढीच्या पद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली.या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळून त्यांचे ज्ञान समृद्ध झाले.