गणेश याग २०२६ चा कार्यक्रम श्री सिध्दिविनायक गणेश मंदिर, पीएमजी वसाहत, नरेंद्र नगर येथे यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मास्तर योगेश यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्कृष्ट नियोजनानुसार मंदिर समिती सदस्य, कार्यकर्ते आणि सेवाभाव असलेल्या नागरिकांच्या सहकार्याने पार पडले.
गणेश याग २०२६ या दिनांक २२ जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत चाललेल्या श्री ची पालखी, सामुहिक अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तने, विविध भजन मंडळाचे भजन, ह.भ.प. धरबुवा खोंड यांचे सुश्राव्य किर्तन, स्वानंद पुंड यांचे श्री गणेश अथर्वशीर्ष माहात्म यावर व्याख्यान, आनंद मेळावा ईत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात वस्तीतील सर्व महिला आणि पुरुषांनी सहभागी होऊन एकत्र येत, एकत्रितपणे गणेश यागाचे आयोजन केले. महाप्रसादाच्या दिवशी जवळपास सात ते आठ हजार भाविकांनी लाभ घेतला, ज्यामुळे या धार्मिक उत्सवाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या मंदिर समितीचे सदस्य म्हणजेच अध्यक्ष दत्ता मैराळ, सचिव योगेश मेडसिंगे, कोषप्रमुख अरुण पाठक, सदस्य श्याम घाटे, सचिन तांबोळी, अग्रवाल, सुर्यवंशी आणि व्यवस्थापक मुलमुले काका यांचा समावेश आहे. योगेश मेडसिंगे यांचे योगदान या कार्यक्रमात विशेष महत्त्वाचे होते, कारण त्यांच्या नेतृत्वामुळे परिसरातील सर्व नागरिक पुढे येऊन गणेश यागाचा कार्यक्रम यशस्वी करतात.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असलेल्या तयारीमध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे man power आणि निधी. योगेश मेडसिंगे यांच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्ते निस्वार्थपणे सेवा देत आहेत. त्यांनी या सफल कार्यक्रमाचे श्रेय स्वत:कडे न ठेवता, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे नागरिक व कार्यकर्त्यांना दिले.
या कार्यक्रमात सहभागी नागरिकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया अत्यंत सकारात्मक होत्या. त्यांनी असे म्हटले की, आज समाजाला संगठीत व आनंदी ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन वारंवार होत राहिले पाहिजे, ज्यामुळे सभोवतालचे वातावरण भक्तीमय व आनंदी होते.
गणेश याग २०२६ च्या यशस्वीतेसाठी सर्व सज्जन शक्तीच्या नियोजनपूर्वक सहभागाने एक सुंदर फुलांचा हार तयार झाला आहे, जो परमेश्वर चरणी अर्पण करण्यासाठी तयार आहे.



