काल दिनांक 6 मार्च 2026 रोजी श्री पिंपरीकरांचे घरी गांधीनगर येथे सकाळी 7 वाजता हिंदू समाजाचे कार्यालयाचे उद्घाटन गजेंद्र आसुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन समारंभात माजी महापौर कुंदाताई मसुरकर, विनयाताई फडणवीस, चंद्रकांत हलकंदर, मधुसुदन शेंबेकर यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
उद्घाटनानंतर 'भारत मातेची आरती' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गजेंद्र आसुरकर यांनी उद्घाटनाच्या वेळी भाषण करतांना सर्व उपस्थितांना कामाला लागण्याचे आवाहन केले.


