सप्तगिरी नगर व नरेंद्र नगर परिसरातील महावितरणच्या डिपीभोवती वाढलेल्या झाडांमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डिपीचे तुटलेले गेट व समोरील कंपाऊंडमधील भगदाडामुळे मोकाट कुत्रे व जनावरे आत शिरून घाण करतात. परिणामी परिसरात अस्वच्छता वाढून नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे.
पाच–सहा फूट उंच वाढलेल्या झाडा-वेलींनी इलेक्ट्रिक पोल व कंपाऊंड पूर्णपणे व्यापले असून, कचरा व साचलेल्या पाण्यामुळे उंदीर व मच्छर यांचा उपद्रवही वाढला आहे.या बाबत जुलैपासून अनेक वेळा तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. फोनद्वारे वारंवार संपर्क साधूनही परिस्थितीत बदल न झाल्याने नागरिकांनी परिसर तत्काळ स्वच्छ करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.
नागपूर: आचार्य धम्मानंद कोसंबी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संशोधन पद्धतीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना संशोधनाची शास्त्रीय दृष्टी विकसित करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त देवग्राम येथे ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण आणि सामाजिक एकोप्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला. नागरिक, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
नागपूर: राष्ट्रीय पोषण महिना २०२६ अंतर्गत एफसीआय येथे ‘न्यूट्रीशन फिएस्टा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा घेण्यात आल्या.