दि. १ मार्च २०२६ रोजी, पौऍड्स क्रि

एशन तर्फे आयोजित 'तुला पाहताना' या कार्यक्रमाचे आयोजन मोरभवन, नागपूर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात प्राचार्य उज्ज्वला अंधारे यांच्या कवितांना प्रसिद्ध संगीतकार गणेश सूत म्हणजेच केदार अभ्यंकर यांनी अप्रतिम चाली लावल्या.

विशेष म्हणजे, या कवितांच्या नवीन गाण्यांचा तो स्वप्नांचा गाव या तिसऱ्या संगीत अल्बमचे विमोचन उत्कर्ष सभागृह, मोर भवन येथे झाले. या प्रसंगी संगीतकार केदार अभ्यंकर व विजया अभ्यंकर यांच्या हस्ते प्राचार्य उज्ज्वला अंधारे यांना सन्मानाचा व्यंजकोपासक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार विविध क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो.

कार्यक्रमात कवितांचे गायन वैशाली पाटील, गौरी सोमलवार, केदार अभ्यंकर, हर्षदा बडे, विलास देशकर, दीप्ती मुंजे, पौर्णिमा अभ्यंकर, सतीश बल्लाळ, नरेंद्र माथुरकर, दीपक तांबेकर आणि किशोर उपगन्लावार यांनी केले. वाद्यवृंदांची साथसंगत मिलिंद दातार, वृंदा दातार, विनय बाळ पुणे आणि गोविंद गडेकर, नागपूर यांनी केली.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अजित पाध्ये यांनी केले. विशेष अतिथी म्हणून मा. प्रशांत पाटील उपस्थित होते. अध्यक्षपद सुप्रसिद्ध कादंबरीकार सौ. विजया ब्राह्मणकर यांनी भूषविले.