नागपूर, गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या एनएसएस व क्रिडा युनिटद्वारे २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची वेळ सकाळी ८:०० वाजता सुरू झाली आणि सकाळी ११:३० वाजता संपली.

कार्यक्रमाचे उद्घाटन अमर सेवा मंडळाचे सचिव आमदार अ‍ॅड. अभिजीतजी वंजारी यांनी ध्वजारोहन करून केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि सर्व उपस्थितांनी भारतीय संविधानाची शपथ घेतली. आमदार वंजारी यांनी याप्रसंगी भारताच्या स्वातंत्र्याबद्दलचे मौल्यवान विचार मांडले.

प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा आधार शोधण्याचा आणि नवीन उत्पादनांचा शोध घेण्याचा सल्ला दिला. यानंतर, गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र शाह यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे महत्त्व आणि स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान सांगितले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सामूहिक गीत, भाषण सादर करून सैनिकांना समर्पीत केले. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली आणि प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शारदा ईश्वरकर यांनी केले आणि आभार प्रा. किमया देवईकर यांनी मानले. अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनीजी वंजारी, अमर सेवा मंडळाचे सचिव तसेच  आमदार  अ‍ॅड. अभिजितजी वंजारी आणि अमर सेवा मंडळाच्या कोषाध्यक्षा तसेच आर.टी.एम.एन.यू.च्या सिनेट सदस्या डॉ. स्मिताजी वंजारी, प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण ,उपप्राचार्य डॉ. राकेश श्रीवास्तव यांनी  एन.एस.एस. व  क्रिडा युनिट विभागाच्या आयोजकांचे कौतुक केले.