सूरसप्तकचा  मराठी भाषा गौरव दिन

नागपूर, 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त, सूरसप्तकने *मन मंदिरा* या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम  सायंटिफिक सभागृहात  संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमात 'केस नंबर ७३' या चित्रपटाची संवाद लेखिका व वेशभूषाकार तसेच सूरसप्तकची गायिका ऋचा येनुरकर भांडारकर हिचा सूरसप्तक तर्फे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची  सुरुवात 'आई भवानी' या गीताने झाली. त्यानंतर 'मन मंदिरा', 'सख्या रे', 'फिटे अंधाराचे जाळे', 'जागेपणी', 'धुंद एकांत हा', 'हिरवा निसर्ग', 'कधी तू रिमझिम', 'जेंव्हा तुझ्या बटांना', 'मला वेड लागले', 'तळव्यावर मेंदीचा' अशा ३१ मराठी एकल आणि द्वंद्व जुनी नवी भावगीते आणि चित्रपट गीते सादर करण्यात आली.

या कार्यक्रमात प्रमुख कलाकारांमध्ये प्रा. पद्मजा सिन्हा, प्रतिक्षा पट्टलवार, अश्विनी लुले, डॉ. ऋचा येनुरकर, संगीता भगत, अर्चना उचके, लता पटेल, अनुजा जोशी, मुकुल पांडे, डॉ. अमोल कुळकर्णी, आशिष घाटे, प्रा. निसर्ग राज, विजय देशपांडे, धीरज आटे, आदित्य फडके, आणि योगेश देशपांडे यांचा समावेश होता. प्रत्येक कलाकाराने त्यांच्या सादरीकरणात मराठी संगीताची गोडी वाढवली.

सूरसप्तकने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे मराठी भाषेला एक नवे महत्त्व मिळाले असून, या भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

नचिकेत देव, पंकज यादव, आशिष घाटे,प्रमोद बावणे, ऋग्वेद पांडे, उल्हास चितमुलवार तुषार विघ्ने या वादक कलाकारांनी दमदार साथसंगत करत मैफिलीत रंग भरला. सुप्रसिद्ध निवेदिका शुभांगी रायलू यांच्या रसाळ निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढली

खूप दिवसांनी फक्त आणि फक्त मराठी गीतांच्या या कार्यक्रमाने रसिक मनावर मोहिनी घातली. खऱ्या अर्थाने मराठी गौरव दिन साजरा झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुण ओझरकर यांचे विशेष सहकार्य लाभले .