स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भावपूर्ण अभिवादन

नागपूर,

 प्रखर राष्ट्रभक्त, थोर साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त नागपूर येथे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, नागपूरच्या वतीने सावरकर चौक स्थित त्यांच्या पुतळ्याला समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे महासचिव अनिल देव यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी सावरकरांच्या ध्येयवादी जीवनाचा आणि राष्ट्राप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाचा गौरव केला. धरमपेठ भाग संघचालक शाम पत्तरकीने, कार्यवाह मोहन देशपांडे, माजी नगरसेवक संजय बंगाले, समिती उपाध्यक्ष डॉ. अजय कुलकर्णी, कार्याध्यक्ष शिरीष दामले, डॉ दिनेश खुरगे, बापू कांबळे, शुभा साठे, अमोल तपासे, भरत महाशब्दे, अनघा पेंडके, दादा तांबेकर, राजेंद्र दोनोडेकर, किशोर वडसमुद्रकर, मुकुंद पाचखेडे, संजय लाखे, शशांक साठे, हरिभाऊ देशपांडे इतर मान्यवर आणि सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात सावरकरांचे विचार हे पिढ्यानपिढ्यांसाठी राष्ट्रभक्तीची ऊर्जा देणारे आहेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे 'वंदे मातरम' गीताचे गायन केले. संपूर्ण परिसर सावरकरांच्या स्मृतीने आणि राष्ट्रभक्तीच्या चैतन्याने भारावून गेला होता.