श्री हनुमान मंदिर, अभ्यंकर नगर येथे एकादशी निमित्त वारी आनंदाची दिंडी सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा दिनांक 25 जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता हनुमान मंदिरातून निघेल.

सर्व भाविकांना नम्र विनंती करण्यात आलेली आहे की त्यांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. या सोहळ्यात संतांची वेशभूषा करून येणाऱ्या भाविकांचे स्वागत केले जाईल.

याशिवाय, हनुमान मंदिरात पसायदान वैश्विक दृष्टीसाठी विश्वप्रार्थना या विषयावर ब्रह्मचारी सुचित चैतन्य यांचे प्रवचन संध्याकाळी सव्वासात वाजता रोज सुरू  आहे.