श्री हनुमान मंदिरात मोहिनी देव पुजारी यांचे भागवत

मोहिनी देव पुजारी यांचे भागवत उद्यापासून श्री हनुमान मंदिर देवस्थान श्रद्धा नंद पेठयेथे सुरू होणार आहे. हा कार्यक्रम 13 ऑगस्ट पासून दररोज सायंकाळी सव्वा सात ते सव्वा आठ वाजेपर्यंत आयोजित केला जाणार आहे.

या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी अभ्यंकर नगर, माधव नगर, डोंगरे लेआउट वस्तीतील भाविकांना आमंत्रित करण्यात आले आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री हनुमान मंदिर देवस्थानातर्फे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी भाविक Whatsapp चा उपयोग करू शकतात.