नागपूर,

 प्रतापनगर शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रतापनगर माध्यमिक विद्यालयाची पालक सभा नुकतीच संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. मुख्याध्यापिका सुनंदा गौरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून सभेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी शिक्षक विजय वानखेडे यांनी विद्यार्थ्यांमधील शिस्तीचे महत्त्व तसेच शाळेबाहेरील चुकीच्या संगतीचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सुनंदा गौरकर यांनी विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती आणि दिवाळीपूर्वी होणाऱ्या परीक्षेबाबत पालकांना माहिती दिली. पालक आणि शिक्षकांनी समन्वयाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष दिल्यास ते आदर्श विद्यार्थी व देशाचे उत्तम नागरिक बनू शकतील.

उपस्थित पालकांनी मनोगत व्यक्त करताना शाळेत दिले जाणारे संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी घेतले जाणारे प्रयत्न याबाबत समाधान व्यक्त केले. सभेच्या यशस्वितेसाठी शिक्षक विजय वानखेडे, मनोज पवार, विशाल चव्हाण, वंदना काळे, नंदिनी सावसाकडे, दीपाली उमाठे आणि मंजुषा सुखदेवे यांनी सहकार्य केले.