नागपूर:
विद्याभारती विदर्भ प्रांत ॲथलेटिक्स स्पर्धा २६ व २७ सप्टेंबर रोजी युनिव्हर्सिटी मैदान, रवीनगर येथे पार पडली. या स्पर्धेत नवयुग प्राथमिक शाळा, राजाबाक्षा येथील विद्यार्थ्यांनी विविध मैदानी प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली.
मुलींच्या १०० व २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आरोही सोमेश्वर विलायतकर हिने प्रथम, तर दिव्या आनंद धानोरकर हिने द्वितीय क्रमांक मिळविला. ४०० मीटरमध्ये देवांशी किशोर लाटकर प्रथम, तर रिया निलेश राणे द्वितीय ठरली. मुलींच्या रिले संघाने प्रथम क्रमांक पटकावला, ज्यात अमयरा सुजित वर्मा, देवांशी किशोर लाटकर, दिव्या आनंद धानोरकर व आरोही सोमेश्वर विलायतकर यांचा समावेश होता.
मुलांच्या १०० व २०० मीटर धावण्यात चिराग रितेश दातीर याने द्वितीय क्रमांक मिळविला. रिले प्रकारातही त्याने द्वितीय क्रमांक पटकावला. विविध शाळांमधून आलेल्या खेळाडूंमध्ये नवयुगच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीची छाप उमटविल्याबद्दल नवयुग परिवारातर्फे त्यांचे कौतुक करण्यात आले.



