प्रकाश पाठक यांच्या आठवणींना भावपूर्ण उजाळा

नागपूर :

राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रकाश पाठक यांच्या निधनानंतर त्यांच्या क्रीडा सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना भावपूर्ण उजाळा दिला. लहानपणापासून एकत्र व्हॉलीबॉलचा सराव, महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील स्पर्धांतील यश, विविध जिल्ह्यांतील सामने आणि भारतीय विद्यापीठ संघातील निवड अशा अनेक अविस्मरणीय क्षणांची यावेळी आठवण काढण्यात आली.

धरमपेठ महाविद्यालयाला विद्यापीठ स्पर्धेत मिळवून दिलेला विजय, अंतिम सामन्यानंतर प्रेक्षकांनी केलेले जल्लोषपूर्ण स्वागत तसेच क्रीडाप्रवासातील अनेक संस्मरणीय अनुभव सहकाऱ्यांनी सांगितले. आरसीएफमधून निवृत्तीनंतर क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी क्लब सुरू करण्याची प्रकाश पाठक यांची इच्छा होती, असेही त्यांनी नमूद केले.

शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित प्रकाश पाठक यांनी आपल्या कर्तृत्वाने अनेक खेळाडूंना प्रेरणा दिली. त्यांच्या निधनाने व्हॉलीबॉल क्षेत्रातील एक समर्पित आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.