नागपूर:
संत गजानन महाराज सेवाभावी संस्थेने हावरापेठ येथे विविध क्षेत्रातील होतकरू नागरिकांचा सत्कार करण्याची परंपरा सुरु केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून, दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने 'जय जवान जय किसान' या संदेशासह या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
या वर्षीच्या दिवाळी साजरी करण्याच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सावनेर नगरपरिषदेचे नगरसेवक आणि पाणी पुरवठा सभापती महेश चकोले, नागपूर भाजपा कार्यकारणी सदस्य मंगेश मोरे, आणि गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक रमेश मेहर उपस्थित होते. या कार्यक्रमात संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात भारतीय सेनेतील माजी सैनिक अनिल येते, जयंता भुसारी, शेतकरी माधुरी दाढे, मनोहर कोटरुगे, दिनेश डेहणे, मामा महल्ले, अनिकेत बांगडे, पोलीस विभागात कार्यरत महिला सिपाई आकांक्षा जोशी, तसेच सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र मंडावी आणि राजू इटनकर यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मोनिन्टो व आकर्षक मिठाई पाकीट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतषबाजी किंवा दिव्यांच्या प्रकाशाचा उत्सव नाही, तर नात्यांमधला गोडवा, माणसांमधला जिव्हाळा आणि आठवणींचा आनंद लुटण्याचा काळ आहे. हा खरा आनंद आहे, जो आपण सर्वांनी अनुभवायला हवा.
संत गजानन महाराज सेवाभावी संस्थेचे संस्थापक मनोहर मोरे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले की, 'जय जवान जय किसान'चा संदेश केवळ शब्दात न ठेवता, प्रत्यक्षात लागू करणे आवश्यक आहे.



