हनुमान मंदिरात एसआयआर अर्ज भरण्याची सुविधा
नागपूर :
अभ्यंकर नगर येथील श्री हनुमान मंदिरात २६ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान एसआयआर (Special Intensive Revision) प्रक्रियेअंतर्गत मतदार नोंदणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी आधार कार्ड व मतदार ओळखपत्र घेऊन सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपस्थित राहून अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी अंकुश शेरकर, सोनू परसकर आणि आनंद कठलेवार हे नागरिकांना मार्गदर्शन व सहकार्य करत आहेत.



