नागपूर:
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तहसील पोलीस स्टेशन व गांधीबाग बगिच्यातील मित्र परिवारातर्फे राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीत पोलीस निरीक्षक संजय मेंढे, भूषण दडवे, पुरुषोत्तम कांद्रीकर, किशोर राठोड, पंकज दहीकर, अनिल मडावी यांच्यासह पोलीस कर्मचारी व गांधीबाग मित्र परिवारातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभात फेरी गांधीबाग बगिच्याला मारून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. उपस्थितांनी 'राष्ट्रीय एकात्मता दिन चिरायू होवो!' आणि 'भारत माता की जय!' अशा देशभक्तिपर घोषणांचा आवाज उठवला.या कार्यक्रमाने एकात्मतेचा संदेश प्रसारित केला असून, सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन देशभक्तीचा अनुभव घेतला. या प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात एकता व एकात्मतेला अधिक प्रोत्साहन मिळते, असे आयोजकांनी सांगितले.



