कृष्णनगरी न्यू नरसाळा सोसायटीच्या मंदिरात ‘दिवाळी पहाट’ हा सांगीतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. दिवाळीच्या फराळात जसे विविध पदार्थांची रेलचेल असते आणि आपण त्याचा मनसोक्त आस्वाद घेतो, अगदी त्याचप्रमाणे कालच्या कार्यक्रमातही विविध प्रकारच्या गीतांची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
१९४८ पासून आजच्या काळापर्यंतची विविध गाणी सादर करण्यात आली. प्रत्येक गाण्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. बाहेरील कलाकारांनीही आवर्जून उपस्थिती लावून कार्यक्रमाची रंगत वाढवली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सोसायटीतही उत्तम गायक कलाकार आहेत, याची सुंदर प्रचिती सर्वांना आली.कार्यक्रमाची सांगता ‘ने मजसी ने’ या देशभक्तिपर गीताने आणि त्यानंतर सामूहिक पसायदानाने झाली. कार्यक्रमानंतर चहा-बिस्किटांचा आस्वाद, एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि छायाचित्रांचे सेशन अशा आनंदी वातावरणात या दर्जेदार सांगीतिक सोहळ्याची सांगता झाली.



