कांद्री, २४ सप्टेंबर २०२६ - प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कांद्रीच्या वतीने नवसाक्षर जनजागृती, वृक्षारोपण आणि ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षणाचे महत्त्व, साक्षरतेची गरज आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे प्रमुख उपस्थित होते. यावेळी शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. प्राचार्य मिलिंद वानखेडे, पटवारी पृथ्वीराज पाणतावणे आणि कांद्री ग्रामपंचायतीचे सचिव मुकुंदा मरस्कोल्हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात, बाल गणेश मंडळ, कांद्री माईन येथे विद्यार्थ्यांनी नवसाक्षरतेचा संदेश देत प्रभात फेरी काढली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन कामिनी पाटील यांनी केले, तर विजय लांडे यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्याम गासमवार, अशोक नाटकर, प्रशांत सरपाते, सुचिता नागपुरे, अनिता खंडाईत, ज्योत्स्ना मेश्राम, अनिता बागडे, बसंत ठकराले, प्रभाकर खंडाते व मिलिंद वाघमारे यांनी सहकार्य केले.



