दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायं. ६:०० वाजता श्री नगर हनुमान मंदिराच्या प्रांगणात नगर पर्यावरण गतीविधी अंतर्गत 'प्रकृती वंदन' कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात परिसरातील नागरिक आणि मातृ शक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात  विनोद किन्हेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. 'प्रकृती वंदन' कार्यक्रमाची सविस्तर माहिती  मिलिंद देशपांडे यांनी दिली. नंतर हनुमान मंदिराच्या प्रांगणातील पुरातन वटवृक्षाचे पुजन व आरती मातृ शक्ती द्वारे करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वितरण करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. वस्तीमध्ये बरेच लोक घरी पूजा करून देवी देवतांच्या मातीच्या, पीओपीच्या मूर्ती बगीचाच्या कुंपण भिंतीवर, विहीरीच्या कठड्यावर, झाडाच्या मुळाशी आणून ठेवून देतात. अशा देवतांच्या मूर्तींची विटंबना होऊ नये म्हणून, विहिंप, पर्यावरण गतीविधी आणि मंदिर कमीटी यांचे संयुक्त विद्यमाने मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्याबाबत उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

कार्यक्रमाला सर्व श्याम वदनलवार, श्रीपाद वैद्य, मोहन मुजुमदार, दिलीप डांगे, शेखर काळे, दिलीप केदार आणि नागरिक तथा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.