द्वेषाची घाण साफ करणे हेच खऱ्या होळीचे दहन : तुषार सुर्यवंशी
नागपूर: माणसाला इतर सजीव प्राण्यापेक्षा विचार करण्याची बुध्दी अधीक आहे. पण माणूस राग, लोभ, मोह, द्वेषाच्या आहारी जाऊन अनमोल जीवनाचा नाश करीत असतो. किर्तन, व्याख्यान प्रवचन कशासाठी ऐकायचे? ते मनोरंजनसाठी नाही तर मानवी मन जोडण्यासाठी आहे. होळी- धुलीवंदन या सणा मागचा खरा हेतु समजून घ्या. डोक्यातील द्वेषाची घाण साफ करणे हेच खऱ्या होळीचे दहन आहे. काय लाकड जाळता विचार करा. स्नेहाचा रंग प्रत्येक मनाला लागू द्या. असे कळकळीचे आव्हान श्रीगुरूदेव सेवा मंडळ विश्वकर्मा नगरच्या धुलिवंदन मोहत्सवात किर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रीय युवा प्रबोधनकार तुषार सुर्यवंशी यांनी केले.
सामुदायिक ध्यान आणि प्रभातफेरी
या धुलिवंदन मोहस्तवाला सकाळी सामुदायीक ध्यानाने सुरुवात झाली. ध्यानानंतर दोन दोनच्या रांगेत एक प्रभातफेरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे राष्ट्रीय भजने गात एम्प्रेसमील कॉलनी, स्वराज कॉलनी, विश्वकर्मा नगर येथील मुख्य मार्गावरून विश्वशांतीचा, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत होती.
स्थानीय सजावट आणि सहभाग
या परिसरातील लोकांनी आपल्या घरासभोवतालचा परिसर स्वच्छ करून, सडासंमार्जन करून, सुंदर रांगोळ्या काढून आपआपल्या संतमहापुरूषांच्या सुंदर प्रतीमांची सजावट केली होती. राष्ट्रीय मापुरूषांच्या विचारांनी आणि जयघोषाने परिसरात राष्ट्रभक्तीच वर्धिष्णु झाली. जवळ चारशे लोकांनी या महोत्सवात सहभाग घेतला.
तुषार सुर्यवंशी यांचे विचार
तुषार सुर्यवंशी यांनी सुसंस्कार, राष्ट्रीय एकात्मता आणि युवकांचे स्वालंबन यांवर भाषण केले. सामुदायिक ध्यानाचा परिपाठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगीतलेल्या विचारातून करण्यात आला. या महोत्सवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रीय भजनांचा समावेश होता.



