गार्डन ग्रुप तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार
नागपूर,
प्रभाग क्रमांक ३५ मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ गार्डन ग्रुपच्या वतीने आज दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी लक्षवेध, नरेंद्र नगर, नागपूर येथे पार पडला.या वेळी नागपूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक मा. रमेशजी भंडारी व सौ. विशाखा मोहोड यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती देऊन गार्डन ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाला गार्डन ग्रुपचे सुमारे २० ते २५ सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान परिसरातील विविध नागरी समस्या व अडचणींबाबतचे निवेदन नवनिर्वाचित नगरसेवकांना देण्यात आले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन नगरसेवकांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाला समस्त गार्डन ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ पंजाबराव मून यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र वासेकर काका आणि गोविंदराव रेवतकर यांच्या हस्ते देण्यात आले. आभार प्रदर्शन लांजेवारयांच्या तर्फे करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला लक्षवेध चे सदस्य श्री संजय पुणेकर, श्री राजश्री कांबळे, फुला देशपांडे, आदित्य शर्मा, रवी भोयर आणि सुरेश भाऊ चव्हारे उपस्थित होते.



