सावनेर येथे 23 जानेवारी 2026 रोजी कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक भव्य स्मृती समारोह आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सावनेरचे आमदार माननीय श्री आशिष बाबू देशमुख व पुरातत्व विभागाचे संचालक श्री मयुरेश खडके उपस्थित राहणार आहेत.

या स्मृती समारोहात विशेषतः विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गडकरी स्मृती निलयचे सचिव श्री राजेश पेंढारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती केली आहे.

कार्यक्रमात चित्रपट सृष्टीच्या अभिनेत्री सौ प्रणाली राऊत व सौ साची जीवने यांना तसेच अनेक नाट्यकलावंतांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये नाट्य अभिनेते श्री मधु भाऊ जोशी, श्री प्रभाकर आंबोने, नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष श्री नरेश गडेकर यांचा समावेश आहे.

या स्मृती समारोहाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीला अभिवादन करणे.