आज दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी, अभय नगर गार्डन उद्यान परिसरात रक्षाबंधन निमित्त वृक्ष रोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात श्री. गायकवाड़ सर, श्री. गट्टेवार सर, डॉ. दासलवार, श्री. देठे सर, श्री. बैस सर, श्री. डॉ. टाकारखड़े, श्री. रोड़े सर, श्री. टेकाडेजी, श्री. लेपांडे, श्री. ला जेवार सर, आणि श्री. मेश्राम यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाद्वारे पर्यावरणाच्या संवर्धनाबरोबरच लोकांचे आरोग्य ठिक राहण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. वृक्षारोपणामुळे परिसरात हरित वातावरण निर्माण होईल आणि लोकांना वृक्षारोपण करण्याची सवय लागेल.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.