गजानन महाराज मंदिर चौक, म्हाळगी नगर, न्यू नरसाळा रोड नागपूर ते म्हाळगी नगर फ्लाय ओवरपर्यंतच्या रस्त्यावर अत्यंत खड्डे आणि अतिक्रमणामुळे वाहतुकीत मोठी अडचण निर्माण झाली आहे. या रस्त्याची लांबी २०० मिटर जवळपास असून, या ठिकाणी १० ते १५ ठिकाणी खड्डे आहेत, ज्यामुळे वाहतूक विस्कळित झाली आहे.

या रस्त्यावर दररोज ३ अपघात होत आहेत, दोन्ही बाजूला अतिक्रमण मुख्यतः विरुद्ध दिशेने चालणाऱ्या वाहनांमुळे आणि खड्ड्यांमुळे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, उड्डान पुलाच्या कामामुळे रिंग रोडवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे, ज्यामुळे T point वर वाहने थांबतात. अतिक्रमणामुळे वाहतुकीत अधिक अडथळे निर्माण झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने काही उपाययोजना केल्या असल्या तरी, दुकाने पुन्हा उभ्या राहिल्या आहेत, ज्यामुळे वाहतुकीत आणखी अडचणी येत आहेत. यामुळे वाहन चालकांना कमी जागेत चालावे लागते आणि अनेकदा वाहनांमध्ये धडक लागण्याच्या घटनाही घडत आहेत.

 स्थानिक नागरिकांनी शासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून जीवित हानी टाळता येईल.

या रस्त्यावर शाडेतील विद्यार्थी, व्यवसायी कर्मचारी आणि व्यापारी यांना सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.